कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
गवळ्याघरी बोभाट उठला ।
माठ दह्याचे फोडू नको रे ॥१॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
रागीट तुझा पिता नंद
मार तयाचा खाऊ नको रे ॥२॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
आली गौळण कपटी राधा,
तिच्या घरात तू जाऊ नको रे ॥३॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
पाळण्यात घालूनी झोके देते,
आता मुला, तू रडू नको रे ॥४॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
वरद्या वांकड्या पेंद्या सुदामा,
ह्यांच्या डावामध्ये खेळू नको रे ॥५॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
नामा म्हणे पतित पावना,
ह्यांच्या नामा तू विसरू नको रे ॥६॥
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।