Keshava Madhava Lyrics

Keshava Madhava Lyrics

केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा

तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिसी मानवा

वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाइ हाकशी, गोकुळी यादवा

वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेउन हाती
रथ हाकुनिया पांडवांचा, पळविशी कौरवा

Leave a comment

Your email address will not be published.